- योजनेचे स्वरूप –
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मुला मुलींच्या पट नोंदणी मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना तसेच जिल्ह्यातील एक विस्तार अधिकारी शिक्षण यांना रोख रक्कमेच्या स्वरुपात बक्षिस दिले जाते.
- योजनेचे निकष –
शाळेमध्ये मुलींची उत्कृष्ट पट नोंदणी करणे आवश्यक आहे. सदरची योजना ही जि.प. शाळेतील शिक्षकांसाठी आहे.
- अंमलबजावणी –
सदर योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.