एकात्मिक बालविकास सेवा योजना विभाग :
विभागाचे नाव – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प क्रमांक १
खाते प्रमुखाचे नाव व पदनाम – श्रीमती मनीषा पालेकर , प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक – ९१५८४८५८३८
विभागाचे नाव – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प क्रमांक २
खाते प्रमुखाचे नाव व पदनाम – श्रीमती सुप्रिया पवार , प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक – ०२३२२ २३६४४८
एकात्मिक बाल विकास सेवा योजना कशासाठी..?
- देशाच्या मानवी साधनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी.
- कोवळ्या बालवयातच, मुलांच्या शरीराच्या, मनाच्या आणि सामाजिक जाणीवेच्या विकासाचा भरभक्कम पाया घालण्यासाठी.
- बालमृत्यू, शारीरीक अपंगत्व, कुपोषण, शाळाशिक्षणात प्रगती असूनही शिक्षण अर्धवट सोडावे लागण्याची परिस्थीती आणि विकसनक्षमतेची प्रतिकूलता यांच्यामुळे उद्भवणारा अपव्यय टाळण्यासाठी, आणि
- बाल विकासाच्या क्षेत्रामध्ये जनतेचा सामूहिक सहभाग लाभावा आणि बाल विकासाच्या कार्यक्रमाला स्वयंपूर्णता प्राप्त व्हावी यादृष्टीने चालना देण्यासाठी.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे उद्देश :
- 0 ते 6 वयोगटातील मुलांचा पोषण व आरोग्य दर्जा सुधारणे.
- मुलांचा योग्य मानसिक, शाररिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे
बालमृत्यूचे, बालरोगाचे, कुपोषणाचे व मध्येच शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे. - बाल विकासाला चालना मिळावी म्हणून विविध विभांगांमध्ये धोरण व अंमलबजावणी याबाबत परिणामकारक समन्वय साधणे.
- योग्य पोषण व आरोग्य विषयक शिक्षणाद्वारे बालकांचे सर्वसामान्य आरोग्य व त्यांच्या पोषण विषयक गरजांकडे लक्ष पुरविण्याबाबत मातांची क्षमता वाढविणे.