ग्रामपंचायत विभाग :
शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ५२ महसुली गावे असून ५२ ग्रामपंचायती आहेत . सदर ५२ ग्रामपंचायतीचे प्रशासन चालविण्याकरिता ५२ ग्रामपंचायत अधिकारी पदे मंजूर आहेत. ४३ ग्रामपंचायत अधिकारी कार्यरत असून ९ पदे रिक्त आहेत. विस्तार अधिकारी (पंचायत) यांची २ पदे मंजूर असून २ विस्तार अधिकारी (पंचायत) कार्यरत आहेत.
विभागाचे नांव – ग्राम पंचायत विभाग, शिरोळ
दूरध्वनी क्रमांक ०२३२२ – २३६४४८
विभाग प्रमुख – श्री.बी.व्ही. कदम, विस्तार अधिकारी (पंचायत )
विभागाची कार्ये –
- तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील तरतुदीनुसार सनियंत्रण करणे.
- ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या दैनंदिन कामकाजाचे पर्यवेक्षण करणे.
- शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करून घेणे .
- शासनाच्या सूचनांनुसार सर्व ग्रामपंचायतींची तपासणी करणे.