विभागाचे नांव – ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग क्र 8 शिरोळ .
खाते प्रमुखाचे पदनांव – उप अभियंता ( वर्ग 1)
खाते प्रमुखाचे नांव- श्री. सुनील लोहार
भ्रमणध्वनी – ७६६६०२९४९७
अ.क्र | कनिष्ठ सहायक/वरिष्ठ सहा मंजूर पदे | कनिष्ठ सहायक/वरिष्ठ सहायक रिक्त पदे | शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंतामंजूर पदे | शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता रिक्त पदे |
1 | २ | 0 | 6 | 1 |
विभागाकडील विविध योजना .
- मुख्यमंत्री पेयजल योजना सन 2017-18ते 2018-2019- मुख्यमंत्री पेयजल योजनेतून बुबनाळ आणि उमळवाड या दोन गावांत योजना सुरु आहे.
- राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना सन 2018-2019 – राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना दत्तवाड व राजापूरवाडी या दोन गावांत योजना सुरु आहेत.
- जल जिवन मिशन .
मुख्यमंत्री पेयजल योजना व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील अपुर्ण कामे जल जीवन मिशन मध्ये घेण्यात आली आहेत. शासनाने र्हर घर नल से जल ` या उपक्रमांतर्गत 2024 पर्यंत नळाद्वारे दरडोई 55 लिटर पाणी देण्याचा संकल्प केला आहे. यासाठी नियोजित करण्यात आलेल्या जल जीवन मिशनला यशस्वी करताना सर्वप्रथम तहानलेल्या गावांसाठी कायमस्वरुपी पाणीपुरवठा उपाययोजना कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत र्हर घर नल से जल ` या योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या नवीन योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणशी किमान 55 लिटर या प्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे . यापूर्वी अस्तित्वातील 40 लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध असणा-या योजना देखील आता 55 लिटर प्रतिमाणशी प्रतिदिवस योजनेमध्ये परिवर्तित होणार आहे. पाणी पुरवठा शाश्वत व्हावा यासाठी आवश्यक सर्व उपाययोजनांची पूर्तता या योजनेमध्ये समाविष्ठ आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना करणे व देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकसहभागातून करण्यात येणार आहे. या योजनेत सर्व शाळा,अंगणवाडया आणि आदिवासी आश्रमशाळा समाविष्ठ करण्यात आल्या आहेत.